Mumbai: काँग्रेसने येत्या 28 डिसेंबरच्या दादर मधील शिवाजी पार्कच्या रॅलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओमिक्रॉनच्या परिस्थितीमुळे काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कालच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी रॅलीला आयोजित करण्यासंदर्भात परवानगी देण्याबद्दल बॉम्बे हायकोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले होते. कारण राज्य सरकाराने या रॅलीसाठी विरोध दर्शवला होता. परंतु मंगळवारी काँग्रेसकडून बॉम्बे हायकोर्टात रॅली संदर्भात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.(Maharashtra: राज्यात 100 टक्के लसीकरणानंतरच बूस्टर डोसचा विचार केला जाईल- अजित पवार)
मुंबई पोलिसांकडून काँग्रेसच्या रॅलीला खरंतर विरोध दर्शवण्यात आला होता. पण महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डाकडून प्रस्तावाला मंजूरी दिली होती. परंतु त्यावर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची प्रतिक्षा केली जात होती.(Maharashtra MLC Election Result 2021: बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीला चपराक आहे, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया)
दरम्यान, जगताप यांनी मुंबईत काँग्रेसच्या मुख्यालयाच्या येथे पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले की, त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणी चर्चा केली. त्यांनी असे ही म्हटले की, गेल्या दहा दिवस रुग्णांमध्ये होत असलेली वाढ पाहता ते चिंतेत होते. तर भाई जगताप यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या दौऱ्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या विरोधासंदर्भात विविध प्रश्न उपस्थितीत केले.
भाई जगताप यांनी असे म्हटले की, आम्हाला कळत नाही का परवानगी दिली जात नाही आहे? जर त्यांना कोविडची काळजी वाटत असेल तर त्या संदर्भातील गाइडलाइन्सनुसार पत्र सुद्धा दिले आहे. जास्त वेळ शिल्लक नसल्यामुळे, आम्हाला परवानगीसाठी न्यायालयात जावे लागले असे ही भाई जगताप यांनी म्हटले होते. परंतु आता काँग्रेसनेच आता ही रॅली स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.