महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी (Maharashtra MLC Election Result 2021) एकून सहापैकी दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एकूण सहापैकी चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana) जासांसाठी निवडणूक लागली. या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे. नागपूर येथून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तर अकोला येथून वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) विजयी झाले. नागपूर येथे ऐनवेळी उमेदवार बदलाचा फटका काँग्रेसला बसला तर अकोला येथून शिवसेना आणि महाविकास आघाडीला आवश्यक मते मिळवता आली नाहीत. भाजपच्या झालेल्या विजयाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीला चपराक आहे - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिश्या आंनद आहे की माझे सहकारी निवडुण आले खर तर "मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला आहे. बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीला चपराक आहे. महाविकास आघाडी तीन पक्ष एकत्र आले म्हणजे विजय होवु शकतो असे जे गणित मांडले होते ते चुकीचे ठरले आहे, या विजयाने हे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रची जनता भाजपच्या पाठिशी आहे आणि पुढेही आम्हाला जनतेचा आशिर्वाद मिळेल. तसेच बावनकुळेंचा विजय हा भाविष्यातील विजयाची नांदी असेल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
Tweet
Media interaction in Nagpur after congratulating Chandrashekhar Bawankule for his victory in #MLCelections !@cbawankule https://t.co/mNiYZMozeg pic.twitter.com/MjwCjNVfkK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2021
राष्ट्रीय नेते मोदी, अमित शाह, नड्डा आणि नितीन गडकरी यांचे आभार
आमचे राष्ट्रीय नेते मोदी, अमित शाह, नड्डा यांचे मी आभार मानतो कारण त्यानी आमच्यावर विश्वास दाखवला तसेच मी विशेष आभार मानतो नितीन गडकरी यांचे, त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही लढलो आणि आम्हाला विजय मिळाला. विजयाच्या मालिकेची सुरुवात यानिमित्ताने झाली आहे. महाविकास आघाडीची मतं ही नागपूर आणि अकोल्यात मिळाली. ज्यांनी मतं दिली त्या सर्वांचे आभार मानतो", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महापालिकेची तयारी केली आहे. भाजप महापालिका निवडणुका चांगल्या फरकाने विजयी होईल. भाजपच महापालिकेत नंबर एकचा पक्ष होईल, असंही त्यांनी सांगितलं. (हे ही वाचा समीर वानखेडे यांना उत्पादन शुल्क विभागाकडून नोटीस, बार परवानासाठी दिशाभुल केल्याचा आरोप.)
काँग्रेसमध्ये जाणं ही पहिली चूक
नागपूर आणि अकोल्यात महाविकास आघाडीची मते आम्हाला मिळाली. महाविकास आघाडीच्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला तसेच ज्यांनी आम्हाला मते दिली, त्यांचे मनापासून आम्ही आभारी आहोत, असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या उमेदवाराला एकच मत मिळालं आहे. खरे तर ते काँग्रेसमध्ये गेले ही त्यांची पहिली चूक होती. तिथे गेल्यावर त्यांची जी अवस्था झाली त्यामुळेच त्यांनी काँग्रेसलाही मत दिलं नाही, असा टोला त्यांनी लगावला.