Maharashtra: कोविड19 च्या विरोधात बूस्टर डोसची (Booster Dose) वाढती मागणी पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकत्याच याबद्दल विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले की, पूर्णपणे लसीकरण झाल्यानंतरच बूस्टर डोसचा विचार केला जाईल. तर नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे हे प्राथमिकता आहे. त्यावेळी ते पुण्यात कोविड19 च्या स्थितीवर बैठक केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.(Omicron Variant: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले)
पवार यांनी असे म्हटले राज्यातील टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी असा सल्ला दिला, जिल्हा प्रशासनाला प्रथम सुनिश्चित करावे लागणार की किती नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पुणे जिल्ह्यात लसीचा पहिला डोस बहुतांश लोकांनी घेतला आहे.(Corona Vaccination: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना इशारा, 'कोरोना लस घ्या अन्यथा..')
पवार यांनी पुढे असे म्हटले की, ज्या लोकांनी दोन्ही लसीचे डोस घेतले आहेत त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती. परंतु केंद्राला बूस्टर डोस बद्दल निर्णय घ्यायचा आहे. तर लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो. त्याचसोबत 12-18 वयोगटातील लसीकरणासाठी सुद्धा विचार केला जाईल. परंतु केंद्राने त्यासाठी परवानगी द्यावी.
दरम्यान, राज्य सरकारने नागरिकांना कोरोनावरील लस घेण्यासाठी वारंवार सांगत आहे. परंतु काही ठिकाणी लसीचे डोस काही ठिकाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाता येत नाही आहे. परंतु आता प्रशासनाकडून मोबाईल वॅनच्या माध्यमातून नागरिकांना लसीचा डोस दिला जात आहे.