उपुमख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati), इंदापूर (Indapur) आणि दौंड (Daund) तालुक्यातील नागरिकांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. या तालुक्यातील नागरिकांनी कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) दुसऱ्या डोसला प्रतिसाद द्यावा. अन्यथा आगामी काळात कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुणे येथे बोलताना अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस जवळपास 100% पूर्ण झाला आहे. आता दुसरा डोस पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले पाहिजे. पाठीमागील लसीकरणाची 10 दिवसांची सरासरी पाहिली तर ती 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. म्हणजे 10 ते 12 दिवसांमध्ये 7 ते 8 लाख लोंकांनी डोस घेतला असल्याचेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, पुढे जिल्ह्यात लोक कोरोना लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, बारामती, इंदापूर आणि दौंड आदी तालुक्यांमध्ये हे प्रामाण अधिक पाहायला मिळत नाही. या चारपाच तालुक्यांमध्ये दुसऱ्या डोसले प्रमाण फारसे पाहायला मिळत नाही. त्यामुळे हे लसीकरण वाढवे यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना यंत्रणा कामाला लावण्याचे आदेश दिल असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (हेही वाचा, Corona Vaccination In Mumbai: मागील दहा दिवसात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाचा वाढला वेग)
लसीकरण कमी असलेल्या तालुक्यांमध्ये भागांमध्ये लसीकरण वाढविण्यसाठी प्रशासन आणि नागरिकांना संधी दिली जात आहे. इतकी संधी देऊनही जर लसीकरणाची संख्या वाढली नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे लस घेतली नाही तर कठोर पावले टाकली जातील. गरज पडल्यास नियम आणखी कडक करु. काहीही करा पण लोकांचे लसीकरण करा. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचा लसीचा दूसरा डोसही पूर्ण करा, असे तज्ज्ञांचे म्हणने असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.