आईस्क्रीममध्ये (Ice Cream) मानवी बोट (Human Finger) सापडल्याच्या प्रकरणात पुण्यातील इंदापूर मधील फॉर्च्यून डेअरी बंद (Fortune Dairy Indapur) ठेवण्याच्या सूचना FSSAI कडून देण्यात आल्या आहेत.  मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन मागवला होता. त्यानंतर या महिलेला आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. यानंतर घाबरलेल्या महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठले. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवलं आहे. (हेही वाचा - ठाण्यातील Supermax कंपनीच्या कामगारांना मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिला दिलासा; मालमत्तेवर कायदेशीर कारवाई करण्यावर प्रतिबंध)

पाहा पोस्ट -

 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) फॉर्च्यून डेअरीला त्याच्या आईस्क्रीममध्ये मानवी मांस आढळल्यानंतर पुण्यातील इंदापूर तालुक्यातील त्यांच्या उत्पादन केंद्रातील काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी 15 जून रोजी प्राधिकरणाने कंपनीच्या इंदापूर युनिटवर छापा टाकला. यम्मो आईस्क्रीममध्ये बोट सापडल्या प्रकरणी  FSSAI ने या सूचना दिल्या आहेत. यम्मो कंपनी इंदापूर, गाजियाबाद आणि पुणे येथील कंपनीतून आईस्क्रीम घेते. आईस्क्रीमध्ये बोट कुठल्या कंपनीतील आईस्क्रीमध्ये सापडलं ते अद्याप समोर आलेलं नाही.  मालाड पोलिसांनी आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी अवयव पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार आहे.