Human Finger Found in Ice cream : मुंबईतील मालाड (Mumbai Malad News) मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमच्या (Ice Cream) कोनमध्ये एका महिलेला चक्क मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. महिलेने मलाड पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी (Malad Police) याप्रकरणी यम्मो या आईस स्क्रीम (Yummo Ice Cream) कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सापडलेले मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवले आहेत. (हेही वाचा:Cigarette Smoking: आठवड्याला 400 सिगारेट ओढणे ब्रिटनमध्ये किशोरवयीन मुलीच्या जीवावर बेतले; फुफ्फुस बंद पडले, साडेपाच तासांची शस्त्रक्रिया करावी लागली )

आयस्क्रिममध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा-

नेमकं प्रकरण काय ?

मलाडमधील ओरलेम येथील रहिवासी ब्रेंडन सेराओ (27) यांनी बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे आईस्क्रीम मागवले होते. त्यांनी यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार महिलेला आईस्क्रीम कोनच्या आत सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. सेराओ या व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना आईस्क्रीममध्ये काय आहे ते तात्काळ समजले. त्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)