
मुंबईत (Mumbai) सध्या चालत्या लोकलमधून स्टंट करत असल्याचे प्रकार वाढत आहेत. या स्टंटबाजीचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्याचसोबत अशा प्रकारच्या स्टंटमुळे एखाद्या व्यक्तीचा जीवसुद्धा जाऊ शकतो. या प्रकारावर रेल्वे पोलिसांची नजर असतेच. परंतु दोन स्थानकादरम्यानच्या अंतरावेळी सुद्धा अशा पद्धतीचे थरारक स्टंटबाजी तरुणांकडून केली जाते.
चेंबूर ते वडाळा दरम्यान लोकमध्ये स्टंट करणाऱ्या दोन मुलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक तरुण लोकलच्या दरवाज्याच्या मध्ये लावण्यात आलेल्या खांब्याला लटकेला आहे. या खांब्यासोबत चालत्या लोकलमधून स्टंट करताना दिसून येत आहे. स्टंटबाजीचा हा प्रकार धक्कादायक असून चुकून एखाद्याचा धक्का लागल्यास खाली पडण्याची शक्यता असते.(वाहतुकीचे नियम मोडल्यास कडक कारवाई होणार, जाणून घ्या नवे नियम)
त्यामुळे स्टंट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून वडाळा पोलीस स्थानकात यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीसुद्धा चालत्या लोकलमधून स्टंटबाजी करण्याचे प्रमाण भयंकर वाढले होते. त्यानुसार पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत कारवाई केली होती.