मुंबई: Hand Sanitizers च्या 10,000 बाटल्यांचा काळाबाजार चारकोप पोलिसांकडून उघडकीस; 2 जणांवर गुन्हा दाखल
Bottles of Hand Sanitizers for Black Marketing | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात मंडळी कोरोना व्हायरसचं जागितक संकट परतवण्यासाठी जीवाची बाजी लावत असताना काही जण या परिस्थितीचा गैर फायदा घेत हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार करत आहेत. दरम्यान चारकोप पोलिसांनी आज (30 मार्च) सुमारे 10,000 हॅन्ड सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त करत 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. The Essential Commodities Act अंतर्गत पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा केला आहे. दरम्यान देशामध्ये कोरोना व्हायरसचं संकट गडद होत असताना सामान्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना फिरण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. राज्यात बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात- राजेंद्र शिंगणे.

आज (30 मार्च) दिवशी भारतामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 1000 च्या पार गेला आहे. तर कोरोनामुळे सुमारे 32 जणांचा मृत्यू झाला असून 940 कोरोना बाधितांवर देशाच्या विविध भागात उपचार सुरू आहेत. अशावेळेस डॉक्टरांना, रूग्णांना कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडू दिला जाणार नाही. कोरोनाचे संकट एकजुटीने परतून लावू त्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशात बचत गट, जेलमधील कैदी ते अनेक नामांकित कंपन्या मास्क, सॅनिटायझर प्रमाणेच व्हेंटिलेटर आणि इतर अत्यावश्यक वस्तू पुरवण्यासाठी पुढे येत आहेत. Coronavirus Outbreak In Maharashtra: पुणे शहरात खाजगी रूग्णालयामध्ये 52 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा 9.

ANI Tweet

दरम्यान आज तामिळनाडू मधील एका सॉफ्टवेअर कंपनीने देखील वैद्यकीय क्षेत्रात मदत म्हणून खास रोबो बनवला आहे. तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli) येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने डॉक्टरांच्या मदतीसाठी ह्यूमनॉयड रोबोट (Humanoid Robot) बनवला आहे. हा रोबोट कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांना मदत करण्यासोबतच डॉक्टरांच्या सेवेलादेखील असेल. विलगीकरण कक्षात रुग्णांपर्यंत औषधं पोहचवण्याचं कामदेखील हा खास रोबो करणार आहे. दरम्यान कोरोना व्हायरस हा मनुष्याच्या खोकल्याच्या, शिंकेच्या थुंकीद्वारा पसरतो त्यामुळे रोबोच्या मदतीने हा संसर्ग कमी करण्याचा अनोखा प्रयत्न केला जाणार आहे.