Mumbai: तोतया सीबीआय अधिकाऱ्याकडून व्यवसायिकाचे अपहरण, 50 लाख रुपये लुटले; मुंबईतील गोरेगाव येथील घटना
Arrested

वनराई पोलिसांनी (Vanrai Police) शुक्रवारी (14 ऑक्टोबर) संध्याकाळी गोरेगाव (Goregaon) येथील एका व्यापाऱ्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे हे चौघे सीबीआय (Central Bureau of Investigation) अधिकारी म्हणून वावरत होते. या तोतया सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाचे त्यांच्या कारमधून अपहरण केले. त्याला नवी मुंबईजवळ ( Navi Mumbai) नेरुळ (Nerul) येथील महामार्गावर फेकून दिले आणि त्याच्याकडील 50 लाखांची रोकड घेऊन पलायन केले.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 जुलै रोजी घडली. तो म्हणाला मी माझ्या कार्यालयात होतो तेव्हा जवळपास सहा जण सीबीआयचे असल्याचे सांगून आत आले. त्यापैकी बहुतेकांनी खाकी पॅन्ट घातलेली होती आणि एकाच्या हातात पिस्तूल होते. त्यांनी मला त्यांच्यासोबत येण्यास सांगितले आणि मी माझ्या कार्यालयात ठेवलेली रोख रक्कमही घेतली. तक्रारदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्याला स्कॉर्पिओमध्ये नेण्यात आले.तेथे त्याला मारहाण करण्यात आली. आम्ही नवी मुंबईत पोहोचलो तेव्हा मला गाडीतून ढकलून देण्यात आले. त्याने या घटनेची तक्रार केली नाही. कारण त्याला त्याच्या जीवाची भीती होती. (हेही वाचा, Intelligence Bureau: आयबीचा अधिकारी शिवसेना आमदाराच्या घरी धडकला; तोतया बिंग फुटताच पोलिसांच्या जाळ्यात सापडला, जाणून घ्या काय आहे प्रकार?)

गोरेगाव पोलिसांनी, सीबीआय अधिकारी म्हणून तोतयागिरी केल्याबद्दल एका टोळीला अटक केली आहे. या टोळीकडे केलेल्या सखोल तपासात गोरेगावच्या व्यापाऱ्याची घटना पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी त्यावर अधिक प्रकाश टाकला असता धक्कादायक माहिती पुढे आली.

पोलिसांनी सांगितले की, एका गुन्ह्याच्या तपासात आम्हाला जेव्हा या नव्या घटनेबाबत समजले तेव्हा आम्ही पीडित व्यक्तीशी संपर्क साधला. त्याला गुन्हा नोंदवण्याचे महत्त्व पटवून दिले. एका अधिकाऱ्याने सांगितले, "पीडितांपैकी काही बेकायदेशीर व्यवसायांमध्ये देखील सामील असू शकतात आणि हे बनावट सीबीआय अधिकारी त्याचा फायदा घेत आहेत, असा आम्हाला संशय आहे.