मुंबई: अंधेरीतील शिवाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने Mission Zero Rapid Action Plan लॉन्च
Mission Zero Rapid Action Plan (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता घराबाहेर पडताना सुद्धा अधिक काळजी घ्यावी असे आवाहन राज्य सरकारनकडून करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दुसऱ्या बाजूला वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांवर अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता मुंबई महापालिकेकडून अंधेरीतील शिवाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये  मिशन झिरो रॅपिड अॅक्शन प्लॅनचे (Mission Zero Rapid Action Plan) लॉन्चिंग करण्यात आले आहे.

तर मिशन रॅपिड अॅक्शन प्लॅनचे लॉन्चिंग केल्यानंतर महापालिकेकडून 50 मोबाईल डिस्पेंन्सरी व्हॅनचा सुद्धा शुभारंभ करण्यात आला आहे. या मोबाईल व्हॅन मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरिवली, दहीसर आणि कांदिवली येथे 2-3 आठवडे रुग्णांच्या सेवेसाठी दाखल असणार आहेत. याबाबत मुंबई महापालिकेने अधिक माहिती दिली आहे.(Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी एका क्लिक वर)

दरम्यान, राज्य सरकारने सु्द्धा कोविड19 च्या चाचणीसाठी येणाऱ्या शुल्काची रक्कम आता 2200 रुपये केली आहे. तसेच कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी त्याच्या प्रादुर्भाव अधिक वाढू नये यासाठी विविध उपाययोजना वेळोवेळी करण्यात येत आहेत. एकूणच जर मुंबईतील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास कोविड19 च्या  रुग्णांचा आकडा 66488  वर पोहचला असून 3671 जणांचा बळी गेला आहे. तर 33491 जणांची प्रकृती सुधारली आहे.