Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासात 3,870 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1,32,075 इतकी झाली आहे. कालच्या दिवसभरात यापैकी 1591 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 65,744 इतकी आहे. राज्यात सध्या एकूण 60,147 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात काल 101 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 6,170 रुग्ण दगावले आहेत. मुंबई (Mumbai)  मध्ये विशेषतः कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काल सुद्धा मुंबईत कोरोनाचे नवे 1242 रुग्ण व 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण रुग्णांची संख्या 66,507 असून यापैकी 33,491 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई सह ठाणे (Thane) , कल्याण- डोंबिवली (KDMC) , या शहरात तसेच पुणे (Pune) , नाशिक (Nashik) , औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात सुद्धा कोरोना पसरत आहे. या जिल्ह्यांची कोरोनाबाधितांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा

दुसरीकडे महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक आढळून आला आहे. तसेच 31 ते 40 या वयोगातील कोरोना रुग्णांची प्रमाण हे सर्वाधिक आहे. याविषयी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी ( 21 जून रात्री 10 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 66488 3671 33491
ठाणे 24388 716 9575
पुणे 15881 601 8622
पालघर 3453 90 1047
औरंगाबाद  3400 174 1880
नाशिक 2762 152 1526
रायगड 2530 91 1541
जळगाव 2258 182 1187
नागपुर 1325 13 833
अकोला 1188 63 757
सातारा 840 38 584
सोलापुर 741 8 670
कोल्हापुर 741 8 670
रत्नागिरी 501 17 334
धुळे 500 46 329
अमरावती 441 22 278
जालना 365 11 231
सांगली 293 7 160
नांदेड 282 11 175
अहमदनगर 280 12 209
हिंगोली 252 1 214
यवतमाळ 233 7 161
लातुर 217 12 139
उस्मानाबाद  176 6 130
सिंधुदुर्ग 163 4 126
बुलडाणा 160 6 104
गोंदिया 101 0 69
बीड 93 3 65
परभणी 85 4 74
नंदुरबार 83 5 36
भंडारा 75 0 49
वाशिम 71 3 17
गडचिरोली 59 1 46
चंद्रपुर  58 0 44
वर्धा 14 1 11
अन्य जिल्हे 114 20 0
एकुण 130611 6006 65384

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत असल्याने किंचित दिलासा आहे. कोरोनाचा डबलिंग रेट वाढला असल्याने धारावी सारख्या कोरोना हॉटस्पॉट मध्ये आता रुग्ण संख्येतील वाढीचा वेग मंदावला आहे. परिणामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सरकारला काहीसा वेळ मिळत आहे.