मुंबई: BPCL प्लांटमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश
Fire | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) येथील चेंबूर (Chembur) परिसरातील बीपीसीएल (Bharat Petroleum Corporation Limited) प्लांटमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला (Fire Brigade) यश आले आहे. मंगळवारी दुपारी 12.40 च्या सुमारास बीपीसीएल प्लांट मध्ये लागल्याची माहिती समोर आली होती. या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होता. ही आग अतिशय साधरण असल्यामुळे यात कोणतीही जीवीतहानी झाले नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मुंबई येथील भारत पेट्रोलियम प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती भारत पेट्रोलियमचे जनसंपर्क अधिकारी यांनी अग्निशमनदलाला दिली होती. भारत पेट्रोलियम परिसरात आज दुपारी धुराचे लोट अकाशात लोटल्याचे दिसल्यानंतर आग लागल्याचे उघडकीस आले. आग ही साधारण असून यावर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे, अशी माहिती भारत पेट्रोलियमचे पीआरओ यांनी दिली. हे देखील वाचा- बोईसर: तारापूर एमआयडीसी येथील कारखान्यात भीषण स्फोट; 8 कामगारांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

याआधी बोईसरमधील तारापुर एमआयडीसी येथील तारा नाइट्रेट एम -3 नामक केमिकल कंपनीमध्ये शनिवारी संध्याकाळची सिलिंडरचा स्फोट झाला होता. यात 8 कामगारांचा आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले होते. जखमींना बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.