बोईसरमधील (Boisar) तारापुर एमआयडीसी येथील तारा नाइट्रेट एम -3 नामक केमिकल कंपनीमध्ये शनिवारी संध्याकाळची सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 8 कामगारांचा आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी आहेत. जखमींना बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच कामगारांची मदत करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह नागरिकांनीही धावून आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अपघात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमी कामगारांना संपूर्ण वैद्यकीय सहाय्य देण्याचे आदेशही दिले आहेत.
प्रदुषण नियंत्रण मंडळाला अंधारात ठेवून मालकाने सुरु केलेल्या केमिकच्या उत्पादनाने आज 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. उत्पादनासाठी मालकाने केलेला प्रयोग फसला आणि कंपनीत झालेल्या स्फोटाने बोईसरमधील तारापूर एमआयडीसीचा तब्बल 25 किमीचा परिसर हादरुन गेला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे शेजारच्या कारखान्यातील गॅलेक्सी नावाची इमारतही जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून संपूर्ण वैद्यकीय सहाय्य देण्याचे आदेशही दिले आहेत. हे देखील वाचा- परभणी: पूर्णा येथील मागासवर्गीय शासकीय निवासी शाळेतील 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
तारापूर एमआयडीसीतील तारा नायट्रेड एम-3 ही कंपनी गेल्या दोन वर्षापूर्वी नटूभाई पटले नावाच्या मालकाने खेरदी केली होती. नटूभाई याने जुन्या कंपनीच्या भूखंडावरच नव्या कारखान्याची इमारतीचे बांधकाम सुरु केले. ए एन के फार्मा असे या कंपनीचे नाव असून प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी नसताना नटूभाईने अमोनियम नायट्रेट या स्फोटक रसायनचे उत्पादन सुरु केले होते, अशी माहिती समोर आली आहे.