
परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पूर्णा (Purna) तालुक्यातील मागासवर्गीय शासकीय निवासी शाळेतील (government residential school) 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यापैंकी 26 विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड (Nanded) येथील शासकीय रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून धोका टळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली असून यासंदर्भात अधिक चौकशी केली जात आहे.
पूर्णा येथील पांगरा रस्त्यावर मागासवर्गीय शासकीय शाळा आहे. या शाळेत एकूण 175 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी गुरूवारी शाळेत उपस्थित असलेल्या 134 विद्यार्थ्यांनी जेवण घेतले होते. मात्र, त्यानंतर 35 विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, डोके दुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर बाधित विद्यार्थ्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली होते. तसेच या संदर्भात स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरिक्षक सुभाष राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील 26 विद्यार्थ्या प्रकती अधिक बिघडली होती. सध्या या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा- मुंबई: बाथरुममध्ये जीव गुदमरून एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू
संपूर्ण घटनेमागचे नेमके कारण तपासणी अहवाल आल्यानंतर कळेल. तसेच दोषींवर कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल. महत्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांची प्रकृतीत सुधारणा होत असून काही विद्यार्थ्यांना डिसचार्ज देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी एका वृत्तपत्राला दिली.