मुंबई: बाथरुममध्ये जीव गुदमरून एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू
Representational Image (Photo Credits: Facebook)

गॅस गिझरमुळे बाथरुममध्ये जीव गुदरमरुन एका अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) बोरीवली (Borivali) परिसरात 5 जानेवारी रोजी घडली होती. ध्रुवी गोहिल असे मृत मुलीचे नाव आहे. ध्रुवी ही अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असून लवकर बाहेर न आल्याने तिच्या घरचे घाबरले. अखेर त्यांनी दरवाजा तोडून पाहिले तेव्हा ध्रुवी बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. याशिवाय गरम पाणी तिच्या अंगावर सांडल्याने ती भाजली होती. त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ तिला जवळील मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल केले. परंतु, शुक्रवारी उपचार दरम्यान ध्रुवीने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

ध्रुवी ही आपल्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहत होती. ध्रुवी ही 5 जानेवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास उठल्यानंतर अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. थंडी सुरु झाल्याने ध्रुवीने आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी गिझर सुरु केले. पाणी गरण करत असताना गिझर बंदिस्त भागातील ऑक्सिजन शोषून घेतो. थंडी वाढल्यामुळे घरच्यांनी झडपा बंद केल्या होत्या. यामुळे ध्रुवीला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली. त्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. परंतु बाथरुमचा दरवाजा बंद असल्यामुळे कोणालाही ध्रुवीचा आवाज ऐकू आला नाही. मात्र, मात्र, ध्रुवीला आंघोळीला जाऊन तास होत आला तरीदेखील ती बाहेर न आल्याने घरचे घाबरले. अखेर घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यानी पाहिले की ध्रुवी जमीनीवर पडली होती. त्यानंतर घरच्यांनी तिला तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. परंतु, शुक्रवारी उपचारा दरम्यान ध्रुवीने अखेरचा श्वास घेतला. (हे देखील वाचा- शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात; 3 जण जखमी)

या घटनेमुळे गोहिल परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.