कोरोनाच्या काळात ऑक्सिमीटरचा वापर करुन तुम्ही शरीरातील ऑक्सिजनच्या स्तराबद्दल माहिती करुन घेऊ शकता. तर ऑक्सिमीटरवर जर स्तर 90 च्या खाली दिसल्यास तुम्हाला थेट रुग्णालय गाठावे लागते. परंतु तुम्ही ज्या ऑक्सिमीटरवर ऐवढा विश्वास ठेवता ते खरंच उपयोगी आहे का? मुंबईतील एक संस्था Consumer Guidance Society Of India यांनी ऑक्सिमीटर संदर्भात एक चिंताजनक खुलासा केला आहे. या संस्थेने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी विक्री करण्यात येणाऱ्या ऑक्सिमीटरच्या तपासातून असे समोर आले की, 15-20 टक्के बाजारात विक्री केले जाणारे ऑक्सिमीटर चुकीची रिडिंग सांगत आहेत. हा दावा अत्यंत धक्कादायकच नव्हे तर ऑक्सिमीटरच्या MPR ला सुद्धा मॉनिटर केले जात नाही आहे. हे ऑक्सिमीटर काही ठिकाणी 5 हजार तर काही ठिकाणी 1000 हजार रुपयांना विक्री केला जात आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात गेल्या 24 तासात 1,20,529 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 1,97,894 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरीही मृतांचा आकडा अधिक आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात सध्या एकूण 2,86,94,879 रुग्ण आहेत. तसेच 2,67,95,549 जणांना डिस्चार्ज दिला आहे. देशातील मृतांचा आकडा 3,44,082 वर पोहचली आहे. (Mucormycosis: म्युकर मायकोसिस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या मनमानीला राज्य सरकारचा चाप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिसूचनेस मंजूरी)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे 14,152 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 5,805,565 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 5,507,058 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामधील 20,852 जणांनी गेल्या 24 तासात नोंद झाली आहे. मुंबईत 1207 कोविड19 च्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहचला आहे.