![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/07/Mumbai-Pune-Expressway.jpg?width=380&height=214)
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल (Panvel) येथील मुंबईला जाणारा एक्झिट मार्ग येत्या 11 फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने पूर्णपणे बंद राहणार आहे. कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधत आहे. नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, या बंदमुळे पनवेल, मुंब्रा आणि जेएनपीटीकडे जाणाऱ्या हलक्या आणि जड वाहतुकीसह सर्व प्रकारच्या वाहनांवर परिणाम होईल. या लागू केलेल्या या निर्बंधाचा उद्देश बांधकाम सुरळीत करणे आणि परिसरात गर्दी टाळणे आहे.
पर्यायी मार्ग-
वाहतूक सुरळीत करण्यासाठी, अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा येथे पळस्पे सर्कलमार्गे एनएच-48 वर वळवली जातील, जेणेकरून ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचतील.
यासह पुण्याहून मुंबईकडे तळोजा, कल्याण आणि शिळफाटा येथे जाणारी वाहने पनवेल-सायन महामार्गावर सरळ पुढे जात राहतील, पुढे पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग-48 मार्गे पुढे जावे लागेल. (हेही वाचा: Mumbai Local Western Railway Block Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 8-9 फेब्रुवारी दरम्यान 13 तासांचा ब्लॉक; Grant Road-Mumbai Central दरम्यान देखभालीचं काम)
मोटार वाहन कायद्यांतर्गत नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे यांनी निर्बंध आदेश जारी केला आहे. एमएसआरडीसी बांधकाम पूर्ण करेपर्यंत हा बंद लागू राहील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाईल, से डीसीपी काकडे म्हणाले.