मुंबईत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणात मोठी घट झाली असून हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा दिसून आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे मुंबईची हवा दुषित झाली होती. हीच बाब लक्षात घेता उच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यास केवळ दोन तासांची मर्यादा घालून दिली होती. दरम्यान आजच्या मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असून मुंबईचा एक्यूआय़ हा (बीकेसी वगलता) 55 वर आहे. बीकेसीतील एक्यूआय हा 100 वर आहे. (हेही वाचा - Mumbai Accident: टॅक्सी आणि टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 3 जखमी; लालबाग फ्लायओव्हरवर येथील घटना)
मुंबई महापालिकेकडून धूळप्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्यात आली होती. मात्र, आता धुळप्रदूषणाने बेजार झालेल्या मुंबईकरांच्या मदतीला अवकाळी पाऊस धावून आला आहे. अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून आली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुढीलप्रमाणे मुंबई - 55 AQI, कुलाबा - 52, भांडुप - 32, मालाड - 50, माझगाव - 44, वरळी - 22, बोरिवली - 54, बीकेसी - 107, चेंबूर - 68, अंधेरी - 53, नवी मुंबई -71