AC Local Train (Photo Credits: ANI)

मुंबईकरांना गारेगार रेल्वेप्रवास करता यावा याकरिता हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एससी लोकल सेवा सुरू करण्यात आली मात्र आता अल्प प्रतिसादामुळे यापैकी हार्बर मार्गावर एससी लोकल (Harbour Line AC Local) सेवा बंद केली जाणार आहे. 14 मेपासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलचा पास काढलेल्यांना तिकिट खिडकीवर शिल्लक दिवसांचा परतावा दिला जाणार आहे.

दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद होत असली तरीही मध्य रेल्वे वर मात्र प्रवाशांचा प्रतिसाद पाहता 12 लोकल फेर्‍या वाढवण्याचा निर्णय झाला आहे. सीएसएमटी ते ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा या मार्गावर एसी लोकलच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने 5 मेपासून एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात केल्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळासाठी प्रतिसाद वाढला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आता रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखील या एससी लोकल सुरू राहतील असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: Mumbai Local Train: मुंबई लोकलमधील गारेगार प्रवास आता आणखी स्वस्त, प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट दरही घटले .

एससी लोकलचं वेळापत्रक आणि दर

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 12 एसी लोकल फेऱ्यांची भर पडल्याने या मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांची संख्या 44 वरून 56 झाली आहे. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी एससी लोकलच्या 14 फेर्‍या होणार आहेत.