Mumbai Local Train:  मुंबई लोकलमधील गारेगार प्रवास आता आणखी स्वस्त,  प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट दरही घटले
Mumbai Local | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मध्य, तसेच पश्चिम उपनगरीय लोकल (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आजपासून एक दिलासा मिळणार आहे. हा दिलासा वातानुकुलित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आहे. आज म्हणजेच 5 मे पासून या वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात (AC Local Ticket) तब्बल 50% कपात होत आहे. याशिवाय ज्या सामान्य म्हणजे विना वातानुकूलीत आहेत त्या लोकल गाड्यांमधील प्रथम श्रेणी तिकीट दरातही कपात करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही गाड्यांच्या मासिक पासमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही.

वातानुकूलीत रेल्वेच्या तिकीट दरात कपत केल्याने अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रामुख्याने चर्चगेट ते बोरीवली, सीएसएमटी ते कल्याण अशा प्रवाशांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. ठाणे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवास करायचा असेल तर त्याचे सध्याचे फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपये आहे. त्यासाठी मासिक पास 755 रुपये इतका आहे. जे अनेकांना अधिक वाटते. तिकीट नव्या सवलीतमुळे त्यात 50% कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिकीट दर आता 85 रुपयांवर आला आहे. (हेही वाचा, मुंबईकरांचा 'फर्स्ट क्लास लोकल' प्रवास आता कमी पैशात, तिकीट दरात 50% कपात)

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यांनी घोषणा करताना शुक्रवारी म्हटले होते की, एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास 65 ऐवजी आता केवळ 30 रुपयांमध्ये करता येणार आहे. लोकांच्या सेवेसाठीच एसी लोकल सुरु करण्यात आली होती. मात्र, तिकीटाचे अधिकचे दर पाहता त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. लोकांनाही हे दर परवडत नव्हते. त्यामुळे एसी लोकलमध्येही दर कमी करण्याचा विचार करण्यातआल्याचे दानवे म्हणाले.