मुंबई: चर्चगेट दिशेने जाणाऱ्या रेल्वेखाली महिलेची चिमुकल्यासह उडी; महिला ठार, बाळ सुखरुप, जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवरील घटना
Jogeshwari railway station | (File Photo)

मुंबई (Mumbai) येथील चर्चगेट (Churchgate) रेल्वे स्थानक दिशेने जाणाऱ्या एका जलदगती लोकल रेल्वेखाली आपल्या बाळासह उडी घेत एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. बाळ मात्र सुखरुप वाचले. जोगेश्वरी रेल्वे स्थानक (Jogeshwari Railway Station) फलाटावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, ही महिला नेमकी कोण आहे. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली यााबबत माहिती मिळू शकली नाही.

प्राप्त माहितीनुसार, चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर येत असल्याचे या महिलेने फलाटावरुन पाहिले होते. ही लोकल फलाटाला लागत होती. इतक्यात या महिलेने फलाटावर उडी घेतली. लोकल अधिक पुढे आल्याने आणि महिलेने अचानक उडी मारल्याने मोटरमनचाही नाईलाज झाला. त्यालाही गाडीवर वेळी नियंत्रण मिळवणे कठीण झाले. अखेर यात महिलेचा मृत्यू झाला. (हेही वाचा, मुंबई: महिलेने लोकलसमोर उडी टाकत संपवले आयुष्य, पण बाळ सुदैवाने बचावले)

दरम्यान, अशा प्रकारे आत्महत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवार अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांचा आकडाही मोठा आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असते. मात्र, अनेक खबरदारीचे उपाय घेऊनही अशा घटना घडतच असल्याचे पाहायला मिळते.