मुंबईतील डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
डोंगरीत इमारत कोसळली (फोटो सौजन्य-ANI)

मुंबईतील (Mumbai)  डोंगरी (Dongari) भागात चार मजली  इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने त्यामधील बहुतांश लोक त्यामध्ये अडकली आहेत. मात्र घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

तांडेल रोडवरील केसरबाई या इमारतीचा निम्मा भाग कोसळला असल्याचे वृत्त समोर येत आहे. या प्रकरणी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळजवळ 40-50 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (मुंबई: वांद्रे येथील भारत नगर परिसरात घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी)

दुर्घटनास्थळी बचाव पथकसुद्धा दाखल झाले असून नागरिकांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु सरकारला या धोकादायक इमारतीबद्दल सांगण्यात आले होते तरीही दुर्लक्ष केल्याची टीका वरिस पठाण यांनी केली आहे. तर राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारती कोसळल्याच्या घटना यापूर्वी सुद्धा समोर आल्या आहेत.