मुंबई: वांद्रे येथील भारत नगर परिसरात घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी
Portion of roof slab of a house fall in Bandra (Photo Credits: ANI)

मुंबईतील वांद्रे (Bandra) परिसरातील भारत नगर भागात (Bharat Nagar Area) घराचा स्लॅब (Slab) कोसळल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत नगर भागातील ट्रान्सिन्ट कॅम्पमध्ये काल रात्रीपासून बांधकाम सुरु झाले. मात्र त्याचवेळेस घराचा स्लॅब अचानक कोसळला आणि त्यात 9 वर्षांचा मुलगा आणि 21 वर्षांची मुलगी हे दोघेजण जखमी झाले आहेत. (मुसळधार पावसामुळे पुणे, कल्याण, मालाड परिसरात भिंत कोसळली, दुर्घटनेत 22 जण ठार)

अलिकडेच मालाड येथील पिंपरीपाडा येथे भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात 21 जणांचा मृत्यू झाला. तर 78 जण जखमी झाले. तर गोवंडीत भिंत दुमजली इमारत कोसळून 8 जण जखमी झाले. चेंबूर येथे भिंत कोसळल्याने 2 रिक्षांचे नुकसान झाले. त्याचबरोबर मुंबईसोबतच पुण्यात येथे देखील अशा प्रकारच्या घटनांमुळे अनेकांचा नाहक बळी गेला आहे. या सर्व घटना ताज्या असतानाच वांद्रे येथून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. (पुणे: इमारतीची संरक्षक भिंत कच्च्या झोपड्यांवर पडली, 15 जणांनी गमावला जीव)

ANI ट्विट:

पावसामुळे भिंत कोसळण्याच्या अनेक घटना मुंबई परिसरातून समोर येत आहेत. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तर काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी दुरुस्ती, डागडुजीची कामे करुन घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हितावह ठरेल.