राज्यात शुक्रवार (29 जून) पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्घटना झाल्याचा घटना समोर येत आहेत. तर आता पुणे (Pune) येथील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीची भिंत ही त्यांच्या समोरील असणाऱ्या कच्च्या झोपड्यांवर पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोंढवा परिसरात बडा तलाब मस्जिद जवळील आल्कर स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत काल रात्री 1.30 वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. तसेच या परिसरात खोदकाम आणि राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
ANI ट्विट
Pune: Death toll rises to 15; search & rescue operation is underway. #Maharashtra https://t.co/sV7p2QUnuy
— ANI (@ANI) June 29, 2019
या प्रकरणी तातडीने पोलिस आणि बचाव कार्यांनी धाव घेतली. तर 15 जणांचा मृत्यू झाला बाब उघडकीस आली आहे. तर अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात सांगण्यात येत आहे.