मुंबई : Indrani Mukerjea सह भायखळा कारागृहामध्ये 38 जण कोरोनाबाधित
Indrani Mukerjea (Photo Credit: PTI/File)

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक वाढणारी कोरोना रूग्णसंख्या चिंतेची बाब बनत चालली आहे. आता महाराष्ट्रात कारागृहांमध्येही कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याचं चित्र आहे. आज मुंबईच्या भायखळा कारागृहाने (Byculla jail) दिलेल्या माहितीनुसार, तेथे 38 जण एका दिवसांत कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये इंद्राणी मुखर्जी चा देखील समावेश आहे. इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) ही शीना बोरा हत्याकांड प्रकरणी अटकेत आहे.

इंद्राणी मुखर्जी ही एक हाय प्रोफाईल व्यक्ती होती. 2012 साली 24 वर्षीय शीना बोराच्या खूनाचे आरोप तिच्यावर आहे. इंद्राणीने आपली मुलगी शीना बोराची हत्या घडवून आणली आणि तिचं शव रायगड जवळील एका जंगलात फेकल्याचे तिच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी ऑगस्ट 2015 मध्ये तिला अटक करण्यात आली. यामध्ये तिचे पहिले पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय याला देखील अटक करण्यात आली आहे. नंतर इंद्राणीचे तत्कालीन पती पीटर याला देखील आरोपी करून अटक करण्यात आली आहे. Lockdown in Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता.

महाराष्ट्रात मागील 5 दिवसांमध्ये विविध कारागृहांत 79 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 61 कैदी आणि 18 जेल प्रशासन अधिकारी असल्याचं समोर आलं आहे. तर आतापर्यंत मीडीया रिपोर्ट्सनुसार, 47 कारागृहांमधील 259 कैदी, 104 जेल ऑफिसर्स कोरोनाबाधित झाले आहे. अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षाअधिक कैदी आहेत. त्यामुळे तेथे कोविड नियमावलीचे अंमलबजावणी, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अवघड जात आहे. परिणामी आता तेथेही विस्फोटक वाढ नोंदवली जात आहे.