Mucormycosis In Maharashtra: म्युकर माइकोसिस आजारासंदर्भात मंत्रालयात पार पडली महत्त्वाची बैठक; राज्यात आजार आता Notified Disease
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

भारतामध्ये कोरोना संकटाचा समाना करता करता अजून एक नवं संकट गडद होत आहे ते म्हणजे Mucormycosis. महाराष्ट्रात या बुरशीजन्य आजाराबद्दल वाढता धोका पाहता आज राज्याच्या मंत्रालयात विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहिती देताना आता या आजराबाबत जन जागृती वाढवण्याची गरज असल्याचं म्हणताना बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय झाले याची देखील माहिती दिली आहे. दरम्यान राजेश टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रामध्ये Mucormycosis या आजाराच्या प्रत्येक रूग्णांची नोंद केली जाणार आहे. अर्थात Notified Disease जाहीर करण्यात आला आहे.

Mucormycosis म्हणजेच काळी बुरशी हा आजार जीवघेणा असल्याने त्याबाबत सामान्यांच्या मनात अधिक चिंता आहे. पण या आजाराशी देखील सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली जात आहे अशी माहिती राजेश टोपेंनी दिली. एम्फोटेरेसीन-बी या औषधाचं रुग्णांच्या प्रमाणानुसार वाटप केंद्र सरकार कडून राज्यांना होत आहे. कोविड प्रमाणेच आता या आजाराच्या उपचारांमध्येही दरांची निश्चिती केली जाणार आहे. यासाठी केंद्राकडेही पाठपुरावा केला जाणार आहे. म्युकर मायकोसिस आजाराचे उपचार खाजगी रुग्णालयात मोफत किंवा कमी दरात करण्याचे प्रयत्न सरकार कडून सुरू आहेत. एम्फोटेरेसीन-बी हे अ‍ॅन्टी फंगल ड्रग्स महाग आहे पण सध्या उपलब्धतेसाठी देखील राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. तर 1जून पर्यंत सरकार 60 हजार एम्फोटेरेसीन-बी उपलब्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Mucormycosis: कोविड 19 वर मात केलेल्या रूग्णांमध्ये Post Recovery त आढळून येणार्‍या या गंभीर Fungal Infectionची लक्षणं काय?

सध्या Mucormycosis चे उपचार घेणार्‍यांमध्ये दिवसाला अंदाजे एम्फोटेरेसीन-बी चे 5-6 डोस दिले जातात. वाढती रूग्णसंख्या आणि अपुरा औषधसाठा यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होऊ नयेत म्हणून काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशात 5 नव्या उत्पादकांनाही या औषध निर्मितीचा परवाना दिला आहे.

काल केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये म्यूकरमायकॉसिसचे 90% – 95% रुग्ण मधुमेहग्रस्त आहेत आणि किंवा स्टिरॉईड्सचे सेवन करीत आहेत अशी माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली आहे.