MSRTC | (Photo Credits: msrtc)

पगारवाढ देऊनही 'विलिनीकरण'च (ST Merger) हवे या मुद्द्यावर ठाम असलेल्या एसटी संपकरी (MSRTC Strike) कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेण्याचा राज्य सरकारने इशारा दिला आहे. त्या दृष्टीने पावलेही टाकण्यास सुरुवात झाली आहे. पेसै (पगारवाढ) देऊनही एसटी कर्मचारी संप करण्यावर ठाम असतील तर पैसे न देता त्यांना संपू सुरु राहिला तर त्यात वाईट काय आहे? असा विचार राज्य सरकारला करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यभरातील अनेक बस डेपो पुन्हा सुरु होत आहेत. अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटी बस रस्त्यावर धावताना दिसू लागली आहे. प्रवशांनीही काहिसा सुटकेचा निश्वास सोडत प्रवासास सुरुवात केली आहे. जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी.

अनिल परब यांचे अवाहन

लॉकडाऊन काळात आगोदर एसटी तोट्यात गेली आहे. आता लॉकडाऊनमधून काहीशी स्थिती बदलत आहे. त्यामुळे संपाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि प्रवाशांना कर्मचाऱ्यांनी वेटीस धरु नये. कर्मचारी कामावर परतले तर त्यांच्या विविध मागण्या आणि मुदद्यांवर चर्चा करता येऊ शकेल. राज्य सरकारनेही एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना आणि योग्य मागण्या विचारात घेऊन पगारवाढ केली आहे. असे असले तरीही काही कर्मचारी संपावर टाम आहेत. त्यामुळे पेसै (पगारवाढ) देऊनही एसटी कर्मचारी संप करण्यावर ठाम असतील तर पैसे न देता त्यांना संपू सुरु राहिला तर त्यात वाईट काय आहे? असा विचार राज्य सरकारला करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. (हेही वाचा, MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे? सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर म्हणतात 'रात्रभर विचार करु, उद्या निर्णय जाहीर करु')

राज्य सरकारने पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत संपात सहभागी असलेले 20,000 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कामावर हजर न झालेल्या 3215 कर्मचाऱ्यांना सरकारने आतापर्यंत कामावरुन निलंबीत केले आहे. तर 1226 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे हा संप आता पुढे कोणत्या स्तरावर जाणार याबाबत उत्सुकता आहे.