Result (फोटो सौजन्य - Edited Image) Representatives Image

MSBSHSE अर्थात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुबारी- मार्च महिन्यात झाल्यानंतर आता निकालाचे वेध लागले आहेत. Maharashtra Board SSC exam results 2025 यंदा 15 मे 2025 च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण हा निकाल जेव्हा जाहीर होणार असतो त्याच्या आदल्या दिवशीच निकालाची तारीख जाहीर केली जाते. Maharashtra Board SSC exam results 2025 हा राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केला जाईल आणि नंतर शाळेत निकालाची प्रत हातात दिली जाते.

दहावीचा बोर्डाचा निकाल कुठे पहाल ऑनलाईन

MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट निकाल पाहता येणार आहे. पण त्यासोबतच mahresult.nic.in, mahahsscboard.in/mr आणि sscresult.mkcl.org या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

दहावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, आईचं नाव हे तपशील टाकावे लागतात. त्यानंतर ऑनलाईन माध्यमातून निकाल पाहता येतो.

मागील वर्षी दहावीचा निकाल 27 मे 2024 दिवशी जाहीर करण्यात आला होता. बोर्डाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी, कॉलेज मधील अ‍ॅडमिशन साठी प्रक्रिया सुरू केली जाते. नक्की वाचा: What To Do After 10th: 10 वी नंतर काय करावे? कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा? जाणून घ्या .

बोर्डाने निकाल लावल्यानंतर मिळालेल्या गुणांवर समानाधी नसलेले विद्यार्थी पेपर्स रिव्हॅल्युएशनसाठी पाठवू शकतात. यासाठी त्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर रिव्हॅल्युएशनसाठी ऑनलाईन अर्ज बोर्डाकडून सुरु केला जातो. अर्ज भरल्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनंतर बोर्डाकडून दहावीचा रिचेकींग निकाल जाहीर केले जातात.