MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam) परीक्षा पुढे ढकलल्याचे कळताच विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये एकच रोष पाहायला मिळाला. एमपीएससी परीक्षा आहे दिलेल्या वेळापत्रकानुसारच व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसेवा आयोगाने सा-या गोष्टीचा साराचार विचार करता आहे त्या तारखेलाच परीक्षा घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेची आधीची तारीख 14 ही बदलून काही दिवस पुढे ढकलत 21 मार्च केली आहे.

नव्या वेळापत्रकानुसार, MPSC ची परीक्षा 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- MPSC 2020 पूर्वपरीक्षेची तारीख आज अखेर जाहीर होणार; 8 दिवसांत घेणार परीक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी दिलेल्या आश्वासनात एमपीएसची परीक्षा आठवड्याभरात होणार असे सांगितले होते. कोरोना व्हायरस संकटामुळे मागील वर्षभरात ही परीक्षा अनेकदा रद्द करण्यात आली होती. काल पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत निर्दशने केली. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी परीक्षा वेळेत घेण्याची मागणी उचलून धरली. या सगळ्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आणि परीक्षा आठ दिवसांतच होईल, असे वचन दिले. तसंच आज परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असे सांगून विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.