सध्या राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 पुढे ढकलण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्र जारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून हा पेपर शनिवार 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. तसंच परीक्षेसाठी नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध होतील, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. (औरंगाबाद: MPSC च्या विद्यार्थ्यांचा महापोर्टल बंद करण्यासाठी अर्धनग्न मोर्चा; 'या' आहेत प्रमुख मागण्या)
पूरपरिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे केली होती. अखेर पूरपरिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीचा विचार करत आयोगाने दिलासादायक निर्णय दिला आहे. (पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान 'अतिवृष्टी स्तंभन अनुष्ठान' विधीचे आयोजन)
MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा केंद्रावर तर एक तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. (महाराष्ट्र पूराचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
तुफानी पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा भागात पूरपरस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मदतकार्य सुरु असले तरी अद्याप परिस्थिती पूर्णत: सावरलेली नाही. मुख्यमंत्र्यासह राज्यातील अनेक नेतेमंडळींनी पूरपरिस्थितीची पाहणी करत नागरिकांच्या मदतीसाठी विविध योजना आखल्या आहेत.