एमपीएससी ची परीक्षा (MPSC Exam) देऊन सरकारी नोकरी देऊ इच्छिणार्यांना आता आयोगाने एक मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये उमेदवारांची कमाल संधींची अट रद्द करण्यात आली आहे. आता उमेदवार प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देऊ शकणार आहेत.
एमपीएससी कडून घेतल्या जाणार्या परीक्षेत निवड प्रक्रियेत सुधारणा प्रक्रियेचा भाग म्हणून आयोगाकडून केंद्रीय लोकसेवा आयोगा प्रमाणे खुल्या गटातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहा संधी, मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी निश्चित केल्या होत्या तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएसीकडून स्पष्ट करण्यात आले होते. पण आता यामध्ये बदल करून आपल्या प्रवर्गाच्या वयाच्या अटीनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. MPSC Rajyaseva Prelims Exam 2022: राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी, 161 पदांवर होणार भरती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/C7I315Xzbo
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 15, 2022
काय आहेत प्रवर्गानुसार वयोमर्यादा?
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38व्या वर्षापर्यंत, मागासवर्गीयांना 43 व्या वर्षापर्यंत तर अनुसुचित जाती जमातीच्या उमेदवारांना 45 व्या वर्षापर्यंत आहे.