MPSC Rajyaseva Prelims Exam 2022:  राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी, 161 पदांवर होणार भरती; 1 जून पूर्वी mpsc.gov.in वर करा अर्ज
MPSC | (File Photo)

एमपीएससी (MPSC) कडून राज्य सेवा पूर्व परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदाची एमपीएससी प्रिलिम्स परीक्षा (Rajyaseva Prelims Exam 2022) 21 ऑगस्ट 2022 दिवशी होणार आहे. ही परीक्षा 161 जागांवर नोकरभरती साठी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच विक्रमी वेळेत एमपीएससीने निकाल जाहीर केला होता त्यानंतर आता आगामी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. एमपीएससीने याबाबतचं सविस्तर नोटिफिकेशन अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

यंदा राज्यात 37 केंद्रांवर ही राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार असून याद्वारा वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ब या आणि बालविकास विभागाच्या पदांची नोकरभरती केली जाणार आहे. UPSC Calendar 2023: यूपीएससी 2023 परीक्षांचे वेळापत्रक जारी; Civil Services Prelims Exam 28 मे दिवशी; upsc.gov.in वर पहा सविस्तर .

पात्रता निकष

वयोमर्यादा 19 ते 38 वर्ष आहे. आरक्षणाप्रमाणे कमाल वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार कोविड 19 संकटामुळे 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधी दरम्यान अधिक वय असलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. उमेदवार किमान पदवीधर असावा. पात्र उमेदवारांची पूर्व परीक्सा 400 गुण, मुख्य परीक्षा 800 गुण आणि मुलाखत 100 गुण अशी तीन टप्प्यात परीक्षा घेऊन अंतिम निकाल तयार केला जाईल आणि मग 161 उमेदवारांची निवड होणार आहे.

दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 544 आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 344 रूपये फी भरावी लागणार आहे.

आज 12 मे पासून सुरू झालेली ही अर्ज प्रक्रिया 1 जून पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार mpsc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज करु शकतात.