UPSC Calendar 2023: यूपीएससी 2023 परीक्षांचे वेळापत्रक जारी; Civil Services Prelims Exam 28 मे दिवशी; upsc.gov.in वर पहा सविस्तर
UPSC | Representational Image (Photo Credits: PTI)

यूपीएससी (The Union Public Service Commission) कडून 2023 साठीच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना यंदा यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वर UPSC Calendar 2022 उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येणार आहे. 4 मे 2022 दिवशी UPSC Calendar 2023 जारी करण्यात आले आहे.

अधिकृत नोटिफिकेशन नुसार, UPSC commission कडून civil services prelims exam 2023 यंदा 28 मे 2023 दिवशी होणार आहे. त्याचं नोटिफिकेशन 1 फेब्रुवारी 2023 दिवशी जारी केलं जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

UPSC Exams मध्ये इच्छुक असलेल्यांना UPSC Calendar 2023 वेबसाईटवरून डाऊनलोड करण्याची मुभा आहे. मात्र या तारखा अंदाजे दिलेल्या आहे. अनेकदा आयत्या वेळेस परीक्षेच्या तारखा बदलल्या जातात त्यामुळे नियमित परीक्षांबाबत अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हांला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ची 2023 ची प्रिलिम्स, CS(P) Examination 2023 ही 19 फेब्रुवारी दिवशी होणार आहे. Combined Geo-Scientist (Main) Exam यंदा 24 जून 2022 दिवशी होणार आहे. याप्रमाणेच नॅशनल डिफेंस अकॅडमी, नेव्हल अकॅडमीची परीक्षा 16 एप्रिल दिवशी होणार आहे.

कसे कराल UPSC Calendar 2023 डाऊनलोड

  • upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • 'Exam' Tab वर क्लिक करा.
  • त्यानंतर 'Calendar' tab वर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज ओपन होईल.
  • आता 'UPSC Calendar 2023' लिंक वर क्लिक करा.
  • आता एक पीडीएफ ओपन होईल.
  • यामध्ये परीक्षांचं वेळापत्रक पाहता येईल.

UPSC Calendar 2023 पाहण्यासाठी डिरेक्ट लिंक.

UPSC कॅलेंडर 2023 मध्ये नोटिफिकेशन जारी करण्याचा तारखा आणि परीक्षा शुल्कासह त्यांची अंतिम तारीख दिली जाणार आहे. उमेदवार हायपरलिंक केलेल्या PDF मध्ये UPSC Recruitment 2022 परीक्षेचे एकूण वर्षाचे वेळापत्रक पाहू शकतात. UPSC Prelims 2023 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. नागरी सेवा मुख्य 2023 परीक्षा 15 सप्टेंबर रोजी होणार असून ती पाच दिवस चालणार आहे.