Monsoon Updates 2020: मुंबई, ठाण्यासाठी 3 ऑगस्टला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर
Image For Representation (Photo Credits: PTI)

आयएमडी यांनी (IMD) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात अतिवृष्टीचा अंदाज आयएमडी यांनी व्यक्त केला आहे. रविवारसाठी आयएमडी यांनी मुंबई आणि रायगडसाठी येल्लो अलर्ट जाहीर केला आहे. म्हणजेच दाटीवाटीच्या क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोळण्याची शक्यता आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात 4 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणासह मुंबई आणि लगतच्या घाटात, मध्य महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार असल्याचे आयएमडी यांनी म्हटले आहे. शनिवार पर्यंत सांताक्रुज येथे 1898.2mm पावसाची नोंद करण्यात आली आहे.

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन महिन्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. राज्यात 1 जून ते 31 जुलै यादरम्यान 538.5 मीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात 5 टक्के अधिक पाऊस बसरला आहे. राज्यात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत जुलैअखेरपर्यंत 7 टक्के पावसाची नोंद झाली होती.तर पुढील 4,5 दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे. 

यावर्षी जून, जुलै महिन्यात अनेक भागात जोरदार पाऊस हजेरी लावतो. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने काहीसे चिंतेचे वातावरण होते. एवढेच नव्हेतर, साधरण 15 ऑगस्टनंतर अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता यापूर्वी हवामान विभागाने वर्तवली होती. यामुळे सखोल भागात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे.