Monsoon Update: सध्या वायू चक्रीवादळापासून (Cyclone Vayu) मुंबईला धोका नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यंदाच्या पावसाच्या काळात मुंबईतील समुद्राच्या लाटा 4.5 मीटरपेक्षा जास्त उसळणार असल्याचे महापालिकेकडून (BMC) सांगण्यात आले आहे. तर महापालिकेकडून समुद्राच्या ठिकाणची परिस्थितीसह कधी आणि कोणत्या दिवशी समुद्राच्या लाटा जास्त उसळणार आहेत याबद्दल वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याचसोबत नागरिकांनी अशावेळी समुद्राच्या किनारपट्टीवर जाण्याचे टाळावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, मुंबईतील समुद्रात जून 5 (बुधवारी) दुपारी 1.136 मिनिटांनी 4.68 मीटर उंचीची लाट, जुलै महिन्यात 5 तारखेला (शुक्रवारी) दुपारी 2.06 मिनिटांनी 4.79 मीटरची लाट, ऑगस्ट मध्ये 3 तारखेला शनिवारी दुपारी 1.44 मिनिटांनी आणि 31 ऑगस्ट रोजी (शनिवारी) 12.35 मिनिटांनी 4.90 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्याचसोबत 1 सप्टेंबर (रविवार) या दिवशी सर्वात मोठी भरती 1.15 वाजता येणार असून समुद्राची लाट 4.91 मीटर उसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(Monsoon Update: समाधानकारक पावसासाठी मुंबईकरांना करावी लागणार अजून 7 दिवस प्रतिक्षा)
भरतीच्या वेळी असणारी लाटांची उंची आणि ओहोटीच्या वेळी असणारी लाटांची उंची या दोघांमधील फरक जेव्हा अतिशय कमी असतो अशा परिस्थितीला ‘नीप टाईड’ म्हणतात. त्यामुळे यंदा पावसाच्या काळात आठ वेळा नीप टाईड असल्याचे सांगण्यात आले आहे.