Molestation Case in Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये योगा टीचरचा विनयभंग; 28 वर्षीय आरोपी अटकेत
मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

मुंबई लोकल (Mumbai Local)  मध्ये एका योगा टीचरचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार 9 एप्रिलची आहे. रात्री 8 च्या सुमारास ट्रेन वांद्रे ते गोरेगाव दरम्यान असताना महिलेसोबत हा किळसवाणा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तिच्या मित्रासोबत प्रवास करत होती.

पीडीत तरूणी आपल्या मित्रासोबत वांद्रे स्थानाअत जनरल कोच मध्ये चढली. ट्रेन सुरू होताच प्रवण विश्वकर्मा या आरोपीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. गर्दीचा फायदा घेत त्याने तरूणीला छेडले. आरोपीने छेडताच तरूणी किंचाळली आणि घडला प्रकार तिने आपल्या मित्राला सांगितला. मग ट्रेनमधील सहप्रवाशांनी देखील आरोपीला बदडलं नंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी जोगेश्वरी चा रहिवासी आहे.

पोलिसांनी पीडीतेच्या तक्रारी वरून आरोपी विरूद्ध छेडछाडीचे कलम लावले. अटकेनंतर आरोपीला कोर्टाला दाखल करण्यात आले. कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. नक्की वाचा: मुंबई लोकलच्या लेडीज डब्ब्यामध्ये पुरूष खुलेआम ड्र्ग्स घेतोय? Viral Video ची पोलिसांकडून दखल (Watch Video) .

आजकाल मुंबई लोकल मध्ये महिलांना प्रवास करताना असुरक्षित वाटत असल्याचं प्रमाण वाढलं आहे. सध्या मुंबई लोकल मध्ये रात्रीच्या वेळेस एक पोलिस कर्मचारी आवर्जून असतो. मात्र सर्रास गर्दुले, भिकारी महिलांच्या डब्ब्यातूनही वावरत असल्याने अनेक महिला प्रवाशांना ट्रेनने रात्रीच्या वेळी एकटं दुकटं फिरणं आता  असुरक्षित वाटत आहे. या बाबतचा नुकताच एक सर्व्हे देखील झाला आहे.