Mohan Bhagwat On Ghar Wapsi: हिंदू धर्म सोडणाऱ्यांची घरवापसी व्हावी- मोहन भागवत
RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat | (Photo Credits: Twitter)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (Rashtriya Swayamsevak Sangh) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज म्हटले आहे की, ज्यांनी हिंतू धर्म सोडला आहे आणि दुसरा कोणताही धर्म स्वीकारला आहे त्यांची घरवापसी ( Ghar Wapsi) व्हायला हवी. चित्रकूट येथे सुरु असलेल्या तीन दिवसीय हिंन्दू एकता महाकुंभ मध्ये मोहन भागवत बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करुन इतर धर्म स्वीकारलेल्यांना पुन्हा मूळ धर्मात परतण्याचे अवाहन केले. त्यांनी म्हटले की, भीती कोणालाही खूप काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता तुटत असते. आम्ही लोकांना जोडण्याचे काम करु. महाकुंभमध्ये सहभागी झालेल्या लोकांना त्यांनी शपथही दिली.

महाकुंभमध्ये शपथ देताना मोहन भागवत यांनी म्हटले की, मी हिंदू संस्कृतीच्या धर्मयोद्धा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या संकल्प स्थळावर सर्वशक्तिमान परमेश्वरास साक्षी ठेऊन शपथ घेतो की, मी आपल्या पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाच्या संरक्षण संवर्धन आणि सुरक्षेसाठी अजीवन काम करेन. मी प्रतिज्ञा करतो की, कोणीही हिंदू बांधव हिंदू धर्मापासून विभक्त होणार नाही याचीही मी काळजी घेईन. जे बांधव धर्म सोडून गेले आहेत त्यांनाही घरवापसी करुन धर्मात परत आणण्याचे काम करेन. त्यांना आपल्या कुटुंबाचाच एक भाग बनवेन. मी प्रतिज्ञा करतो की, हिंदू भगिनींच्या अस्मिता, सन्मान आणि शीलाचे रक्षण करण्यासाठी सर्वस्व आर्पण करेन. जाती, वर्ग, भाषा, पंथ या भेदांच्याही पलीकडे जाऊन हिंदू धर्माला सशक्त अभेद्य बनविण्यासाठी माझे जीवन व्यतीत करेन. (हेही वाचा, Mohan Bhagwat Dussehra Speech 2021: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे विजयादशमी निमित्त बौध्दिक; ओटीटी प्लॅटफॉर्म, रासायनिक शेती, अंमली पदार्थ, बिटकॉईन यांसह विवध विषयांवर भाष्य)

पुढे बोलताना भागवत यांनी देव आणि दानव यांच्यातील संघर्षाच्या कथेचे उदाहरण देत म्हटले की, कोणत्याही पक्षाला राज्याची सत्ता ही परमेश्वराच्या रस्त्यावर चालूनच मिळेल. कोणाचेही नाव न घेता भागवत यांनी टोलेबाजीही केली. त्यांनी शपथ घेत म्हटले की, मी हिंदू संस्कृतीची मर्यादापूर्वक सर्वांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.