Mohan Bhagwat Dussehra Speech 2021: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे विजयादशमी निमित्त बौध्दिक; ओटीटी प्लॅटफॉर्म, रासायनिक शेती, अंमली पदार्थ, बिटकॉईन यांसह विवध विषयांवर भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (Rashtriya Swayamsevak Sangh) दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा आणि सरसंघचालकांचे बौध्दिक आज (15 ऑक्टोबर) आज सकाळी पार पडले. सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्वयंसेवकांना बौद्धिकाद्वारा मार्गदर्शन केले.

Mohan Bhagwat Dussehra Speech 2021: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे विजयादशमी निमित्त बौध्दिक; ओटीटी प्लॅटफॉर्म, रासायनिक शेती, अंमली पदार्थ, बिटकॉईन यांसह विवध विषयांवर भाष्य
RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat | (Photo Credits: Twitter)

विजयादशमी म्हणजेच दसरा (Dussehra 2021) निमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात राजकीय पक्ष आणि सांस्कृतीक संघटनांचाही समावेश आहे. शिवसेना दसरा मेळवा (Shiv Sena Dussehra Melava 2021) आज सायंकाळी मुंबई येथे पार पडत आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (Rashtriya Swayamsevak Sangh) दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा आणि सरसंघचालकांचे बौध्दिक आज (15 ऑक्टोबर) आज सकाळी पार पडले. सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्वयंसेवकांना बौद्धिकाद्वारा मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform), रासायनिक शेती (Chemical Farming), अंमली पदार्थ (Drugs), बिटकॉईन (Bitcoin) यांसह विवध विषयांवर भाष्य केले.

मोहन भागवत यांनी या वेळी सांगितले, देशात अंमली पदार्थांचे आव्हान वाढले आहे. हे आव्हान कसे थोपवायचे हे एक मोठे आव्हान आहे. देशात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा वापर वाढतो आहे. समाचातील उच्च वर्गापासून ते खालच्या स्तरापर्यंत अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचे दिसते. या व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो. हे सर्वांना माहिती आहे. प्रामुख्याने सीमेपलीकडील देश त्याला प्रोत्साहन देत आहेत. (हेही वाचा, Shiv Sena Dussehra Melava 2021: शिवसेना दसरा मेळावा, षण्मुखानंद सभागृहात धडाडणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ, BMC निवडणुकीचे बिगूल फुंकण्याची शक्यता)

मोहन भागवत यांनी पुढे बोलताना म्हटले, बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे लागणार आहे. देशात अनियंत्रित गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मही तसेच आहे. लहान मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काय दाखविले जात आहे, यावर विचार करण्याची गरज आहे. कोरोना काळात लहान मुलांच्या मोबाईल वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

ट्विट

राजकीय पक्ष एकमेकांसोमोर येणे हे ठिक आहे. परंतू, देशातील सरकारेही एकमेकांसमोर उभी राहात आहेत. हे चित्र बदलायला हवे. संपूर्ण देश म्हणून आपण एकत्र यायला हवे. अनेक गोष्टी स्वत:हून बदलायला हव्यात. सरकार गोष्टी बदलत आहेत. त्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू ते बदलीत तेव्हा बदलतील. हे सगळे बदलणे ही आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारशिवायही आपल्याला अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्या आपण करायला हव्यात असेही मोहन भागवत म्हणाले.

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).