Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आज त्यांचा 17वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 9 मार्च 2006 रोजी मनसे (MNS) या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. मागील 17 वर्षांमध्ये राज ठाकरे आणि मनसे यांनी अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. आता 'नव्या आयुधांसह... नवनिर्माण सज्ज' म्हणत मनसैनिक पुन्हा सज्ज झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन मधून संबोधित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या भाषणातून ते मनसैनिकांना कोणता संदेश देणार याकडेही सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी सोशल मीडीयामध्ये राज ठाकरे यांनी ट्वीटर वरून मनसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे सोबतच ' महाराष्ट्र सैनिकांच्या निर्व्याज निष्ठेसमोर नतमस्तक' या एका भावनिक संदेशाची ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे.

पहा राज ठाकरेंचा संदेश

(नक्की वाचा: Sandeep Deshpande Attack Case: 'स्टंप' ने हल्ला केलेल्यांचा 'कोच' कोण हे आम्हांला ठाऊक; संदीप देशपांडे यांची हल्ला प्रकरणी पत्रकार परिषदेत माहिती).

आगामी निवडणूका, राज्यातील बदलती राजकीय समिकरणं, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेला शिवाजी पार्क परिसरातील हल्ला यावर मनसे अध्यक्ष आज काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. सोबतच आजच्या दिवसाचं औचित्य साधून मनसेचं नवं स्फुर्तीगीत “नवनिर्माण घडवूया” देखील लॉन्च केले जाणार आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील या गाण्याचा टीझर यापूर्वी काही मनसे नेत्यांनी शेअर केला आहे.