Raj Thackeray on CM Uddhav Thackeray: 'राज्य' उद्धव ठाकरे यांच्यावर आले आहे, की त्यांच्या हातात आले? राज ठाकरे यांची मिश्कील कोटी
Uddhav Thackeray, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजच्या (6 मार्च) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर मिश्कील कोटी करत टोला लगावला. राज ठाकरे यांनी या वेळी त्यांना कोणीतरी पाठवलेल्या एका विनोदाचा दाखला दिला. ते म्हणाले की, या विनोदात म्हटले होते की, ''राज्य' उद्धव ठाकरे यांच्यावर आले आहे, की त्यांच्या हातात आले'. या वेळी राज ठाकरे यांनी राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यात वारंवार लॉकडाऊन (Lockdown) लागू करावा लागणे योग्य नाही. याशिवाय शालेय शिक्षण, परीक्षा यांबाबतही गांभीर्याने पावले टाकणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे हे मुळात एक चांगले व्यंगचित्रकार आहेत. मराठी भाषेवरही त्यांची चांगलीच पकड आहे. त्यामुळे बोलण्यातील उपरोध, छाटा, कोट्या यांचा ते बेलमालुम उपयोग करतात. आपल्या जाहीर भाषणांतून ते नेहमीच याची झलक दाखवत असतात. राज ठाकरे हे छान मिमिक्रीही करत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या पहिल्याच भाषणात याची जोरदार झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर पुढची अनेक वर्षे महाराष्ट्राने राज ठाकरे यांनी विविध नेत्यांची केलेली मिमिक्री पाहिली आहे. अलिकडील काही वर्षांमध्ये राज ठाकरे यांनी जाहीर भाषणांतून राजकीय नेत्यांची मिमिक्री अपवादानेच केली आहे. (हेही वाचा, Raj Thackeray यांचा परप्रांतीयांवर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रातील कोरोना आकडा वाढवण्याचं सांगितलं ‘हे’ एक कारण!)

राज ठाकरे यांनी केलेली लालू प्रसाद यादव, नरेंद्र मोदी, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुशीलकुमार शिंदे, अभिनेते नाना पाटेकर, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, यांची मिमिक्री चांगलीच चर्चेचा विषय ठकली होती. राज ठाकरे यांच्या भाषणात केली जाणारी मिमिक्री हा त्यांच्या चाहत्यांचा एक खास आकर्षणाचा केंद्रबिंदू नेहमीच राहिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आज (6 मार्च) पत्रकार परिषदेत विवध मुद्द्यांवर भाष्य केले. मूळ मुद्द्यांपासून प्रसारमाध्यमं भटकत आहेत. असे अनेक प्रकरणांमध्ये घडते. अंबानी यांच्या निवास्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या भरलेली गाडी ठेवल्याच्या प्रकरणातही असेच घडताना दिसत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला हा विषय महत्त्वाचा नाही तर अंबानी यांच्या निवास्थानाजवळ पोलिसांनी जिलेटीनच्या कांड्या भरुन गाडी नेमकी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली? हा विषय महत्त्वाचा आहे. ज्या परमबीर सिंह यांना मंबई पोलील आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर 100 कोटी रुपयांबाबत साक्षात्कार झाला तो त्यांना आधी का झाला नाही. जर त्यांना पदावरुन हटवले असते तर ते हे बोलले असते का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला.