
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वावरत असताना राज्यातील महसुली तूट भरून काढण्यासाठी मद्य विक्री सुरु करण्यात यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रातून केली होती. दरम्यान, शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून राज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. यातच राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज ठाकरे यांच्या सूचनेला समर्थने केलेआहे. “राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडची आहे,” असे सांगत भुजबळ यांनी त्यावर भाष्य केले आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे राज्यासमोर अर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील तूट भरून काढण्यासाठी मद्य विक्री सुरु करण्यात यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवर राज ठाकरे यांच्या सुचनेला समर्थन केले आहे. दरम्यान, ते म्हणाले की, कोरोना संकटामुळे उत्पन्नाचे रस्ते मात्र बंद झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली मद्य विक्रीची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडे जाऊन केलेली आहे. मद्य विक्री म्हणून नाही, तर सगळेच पर्याय बंद आहेत. पेट्रोल डिझेल, स्टॅम्प ड्यूटी बंद, केंद्राकडून जीएसटीचा परतावा आलेला नाही. त्यामुळे उत्पन्नाचे रस्ते हळूहळू खुले होणे आवश्यक आहे. ते कोणत्याही माध्यमातून खुले करावेच लागतील. महाराष्ट्रालाच नव्हे तर, सगळ्याच राज्यांना हा निर्णय घ्यावा लागेल,” असे भुजबळ म्हणाले आहे. हे देखील वाचा- मुंबई: चुनाभट्टी पोलिस स्टेशन बाहेर Hand Washing Machine ची सोय; COVID 19 संकटात पोलिसांसाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचा स्त्युत्य उपक्रम
कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 24 हजार 506 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 06 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. त्यांपैकी 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 840 जण कोरोनामुक्त झाले आहेत.