कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) वाढवण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार, आजपासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे देशातील विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी पाठवण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन (Shramik Special Trains) सुरु करण्यात आल्या आहेत. यातच आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथून 1600 स्थलांतरित कामगारांना (Migrant workers) घेऊन 3 'श्रमिक विशेष ट्रेन' बिहारला रवाना होणार आहे, अशी माहिती मुंबईचे एसीपी एस.एस. धोंडे (LS Dhonde) यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 पासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची अगतिकतेतून सुटका करण्यासाठी आणि त्यांना मूळ गावी पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1600 स्थलांतरित कामगारांना घेऊन 3 'श्रमिक विशेष ट्रेन' बिहारला रवाना होणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांत अडकलेल्या परराज्यांतील मजुरांच्या प्रश्न लॉकडाउनपासून चर्चेत होता. लॉकडाउनमुळे मूळ गावी निघालेले लाखो मजूर अनेक राज्यांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यात अडकून पडले आहेत. बस, रेल्वे आणि विमानसेवा बंद करण्यात आल्याने अन्यत्र शिकत असलेले विद्यार्थी, यात्रेकरू यांनाही घरी परतणे अशक्य झाले होते. हे देखील वाचा- महाराष्ट्रात COVID 19 विरूद्ध लढण्यासाठी 'आयुष' उपचार पद्धतीने रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न; 'टास्क फोर्स' ला राज्य सरकार कडून मंजुरी
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra: Migrant workers gathered at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus in Mumbai today to board 'Shramik special' trains to Bihar. "3 trains will depart for Darbhanga, Kishanganj & Katihar. All trains will carry around 1600 migrants," says LS Dhonde, ACP Mumbai. #COVID pic.twitter.com/s30FnDUt08
— ANI (@ANI) May 18, 2020
लॉकडाउन दरम्यान शहरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुर परत जाण्यासाठी सुविधा पुरण्याची मागणी केली होती. त्यामुळे या मजुरांसह परराज्यांत अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यास परवानगी द्यावी आणि त्यांच्या प्रवासाची सोय करावी, अशी मागणी राज्यांनी केंद्राकडे केली होती. केंद्राकडून परवानगी मिळालेल्यानंतर देशात ठिकठिकाणी श्रमिक विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या होत्या.