म्हाडा पुण्यामध्ये (MHADA Pune) सध्या 4222 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. सध्या त्याची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.म्हाडाकडे या घरांसाठी 52,928 अर्ज आलेले आहेत. नागरिकांचा प्रतिसाद पाहून आता अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत वाढवून दिली जात आहे. 16 डिसेंबर ही अंतिम मुदत वाढवून 22 डिसेंबर करण्यात आली आहे.
म्हाडा च्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे. दरम्यान पुण्यातील या लॉटरीची सोडत 7 जानेवारी 2022 दिवशी पुणे जिल्हा परिषद ऑडिटेरियम मध्ये काढली जाणार आहे.
म्हाडा पुणे सोडतीसाठी आलेल्या एकूण 52928 अर्जांपैकी 32553 जणांनी अनामत रक्कम देखील भरली आहे. यामध्ये पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्प उपलब्ध असणार आहेत. हे देखील वाचा: CIDCO 2022 Lottery: सिडको कडून जानेवारी 2022 मध्ये 5 हजार घरांसाठी लॉटरी निघणार; मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती .
म्हाडा पुणे यांच्याकडून मागील दीड वर्षाच्या काळात 3 वेळा सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेकांची स्वतःच्या मालकीच्या घर खरेदीची स्वप्न पूर्ण झाली आहेत. आता म्हाडाच्या 4222 घरांसाठी लॉटरीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरूवात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली होती.