म्हाडा लॉटरीमधील 13 हजार विजेते अद्याप गृहप्रतीक्षेत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Facebook)

म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाकडून 2010-2018 मध्ये घरांची सोडत जाहीर केली होती. परंतु अद्याप म्हाडाच्या घरांच्या सोडतीमधील विजेत्यांना अद्याप घरांचा ताबा देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षात म्हाडाकडून 20 हजार गृहनिर्मिती केली. परंतु अपुऱ्या कर्मचरी वर्गामुळे लॉटरी विजेत्यांना घरे उपलब्ध करुन देण्यात आलेली नाहीत.

2018 रोजी म्हाडाने 9 हजार घरांसाठी सोडत जाहीर केली. त्यामधील 13 हजार विजेते अद्याप गृहप्रतीक्षेत आहेत. तसेच विजेत्यांच्या कागदपत्रांची पताळणी करण्यासाठी म्हाडाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचसोबत म्हाडा कोकण मंडळात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून त्यांच्यावर लोकसभा निवडणूक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूकीच्या कामासाठी करण्यात आल्याचे सुद्धा सांगण्यात आले.

(MHADA Nashik Board Lottery 2019: नाशिक मधील म्हाडा च्या 1126 घरांसाठी विजेते आणि प्रतिक्षेत असणाऱ्या भाग्यवंतांची यादी lottery.mhada.gov.in वर जाहीर)

त्यामुळेच विजेत्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अधिक विलंब होणार असून त्यांना वाट पहावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता विजेत्यांची फरफट होत असून त्यांना वांद्रे येथील म्हाडाच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. तसेच विजेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे कर्मचाऱ्यांच्या अंगलट येत असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे.