म्हाडा (Photo Credits-Facebook)

MHADA Nashik Lottery Draw Results 2019: महाराष्ट्रात हक्काचे घर मिळवण्यासाठी अनेक जण स्वप्न पाहत असतात. हक्काच्या घराचं स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी अनेकजण म्हाडा लॉटरीमध्ये (MHADA Lottery) आपलं नशीब आजमवतात. यंदा लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आणि निकालांमुळे पुढे ढकलण्यात आलेली म्हाडा घरांच्या लॉटरीला आजपासून सुरूवात झाली आहे. मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरात या म्हाडा घरांची लॉटरी निघणार आहे. आज (29 मे) सकाळी 10 वाजल्यापासून नाशिक शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृह मुंबई नाका नाशिक येथे म्हाडा लॉटरीला सुरूवात झाली. पहा मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातील म्हाडा घरांची लॉटरी कधी? 

ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात म्हाडा लॉटरी पाहता येऊ शकते.  नाशिकमध्ये  म्हाडाच्या 1126 घरांसाठी सोडत निघाली होती. ही सोडत सर्व उत्त्पन्न गटासाठी खुली होती.  म्हाडाच्या संकेतस्थळावर विजेत्यांची यादी जाहीर होईल. पण ऑनलाईन स्वरूपात म्हाडा लॉटरीचा निकाल कसा पहाल?

म्हाडा लॉटरी 2019 निकाल कसा पहाल?

  • lottery.mhada.gov.in ओपन करा.
  • या संकेतस्थळावर तुम्ही ज्या ठिकाणी लॉटरीच्या घराचा अर्ज भरला आहे त्यावर क्लिक करा.
  • मेन्यु बार वर तुम्हांला Lottery Result वर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉटरी रिझल्टची लिंक ओपन होईल.
  • तुमच्या स्कीम नंबर आणि कॅटेगरीनुसार भाग्यवान विजेत्यांची आणि प्रतीक्षेत असल्याची यादी पाहता येईल.

अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच लॉटरी जनरेशन क्रमांक असेल. नाशिकच्या पात्र अर्जदारांची यादी 30 मे च्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर जाहीर केली जाणार आहे. त्यापुढे पात्र अर्जदारांच्या कागदपत्राची छाननी केली जाईल तर अपात्र उमेदवारांना रिफंड दिले जाणार आहेत.