म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (MHADA Konkan Division) मागील महिन्यात म्हाडा घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत ती सुरू राहणार होती पण आता म्हाडाने या कोकण मंडळातील घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. म्हाडाच्या घरांचं स्वप्न पाहणार्यांसाठी आता 29 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. दरम्यान अर्ज प्रक्रिया मध्ये अर्ज नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ असणार आहे. अर्ज प्रक्रिया लांबली असली तरीही सोडत मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार 14 ऑक्टोबरलाच निघणार आहे.
म्हाडाने दिलेल्या नवीन वेळापत्रकानुसार अर्जदारांना संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी 29 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत वेळ आहे. नोंदणीकृत अर्जदारांना 30 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन तसेच बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम 1 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत भरता येणार आहे.
मागील 2-3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोकण मंडळाकडून म्हाडाच्या घरांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये ठाणे, कल्याण, वसई-विरार, मीरा-भाईंदर भागामध्ये 8984 घरांसाठी ही लॉटरी जाहीर होणार आहे. 14 ऑक्टोबरला ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात त्याची सोडत जाहीर केली जाणार आहे. दरम्यान अर्ज प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे. www.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. नक्की वाचा: MHADA आणि SRA च्या नव्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक .
कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 6195 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 1775, मध्यम उत्पन्न गटासाठी 234 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1 अशी एकूण 8205 घरांचा समावेश आहे. आणि 700 उरलेल्या घरांचा समावेश असणार आहे.