म्हाडा (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रभर सामान्य नागरिकांच्या आवाक्यामध्ये स्वप्नातील आणि हक्काच्या घरांसाठी म्हाडा (MHADA) कडून विशेष प्रयत्न केले जातात. मुंबई, पुणे पाठोपाठ काल औरंगाबाद विभागाकडून देखील घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ऑनलाईन माध्यमातून 864 घरांसाठीच्या लॉटरीच्या निकालाची घोषणा केली आहे. आता म्हाडाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच mhada.gov.in वर यशस्वी अर्जदारांची आणि प्रतिक्षेत असलेल्या अर्जदारांची संपूर्ण यादी अपडेट केली आहे. जर तुम्ही देखील यंदा औरंगाबाद विभागामध्ये म्हाडाच्या (MHADA Aurangabad Board Lottery) घरांसाठी अर्ज केला असेल तर तुमचं नाव या यादीत आहे का? हे नक्की तपासून पहा.

औरंगाबाद मंडळातर्फे हिंगोली येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 132, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 48, पडेगाव-औरंगाबाद येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 368 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 168 सदनिका व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील 20 टक्के सर्व समावेश योजने अंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 148 सदनिका अशा विविध उत्पन्न गटांतील एकूण 864 सदनिकांची सोडत पार पडली आहे.  नक्की वाचा: Dangerous Buildings: पावसाळयाआधी मुंबईमधील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी जाहीर; MHADA ने केले सर्वेक्षण (See List).

औरंगाबाद विभाग 864 सदनिकांची सोडत

यशस्वी अर्जदारांच्या यादीसाठी येथे क्लिक करा

प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांसाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील 5% घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असेल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील म्हाडा सर्वसामान्यांच्या आवाकात येतील अशी घरं बांधण्याच्या विचारात आहे.