पुणे पोलिसांतील दहशतवाद विरोधी पथकाने (Pune ATS) सुमारे 12 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज (Mephedrone Drugs) पकडले आहे. पुणे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात एक जणास अटक करण्यात आली आहे. पोलीस उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहे. एमडी ड्रग्जला 'म्याव म्याव ड्रग्स' असेही संबोधले जाते. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडल्याने आता ड्रग्ज तस्करांनी आपला मोर्चा पुण्याकडे (Pune Crime News) वळवला आहे का, असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
महंमद फारुख महंमद उमर टाक (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी पश्चिम, मुंबई, मूळ रा. राजस्थान) नामक आरोपीला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. त्याच्याकडून 11.80 लाख रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) अं ड्रग्ज पकडण्यात आले आहे. पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौक येथे एक व्यक्ती ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळा्ली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. हा व्यक्ती आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. या झडतीत त्याच्याकडे ड्रग्ज आढळून आले. (हेही वाचा, Mumbai: इंटरनेटवर फोन नंबर पाहून रिसॉर्ट बुक करून मुंबईतील अधिकाऱ्याची एक लाख रुपयांची झाली फसवणूक)
महंमद फारुख महंमद उमर टाक याच्याकडून पुणे पोलिसांनी डग्ज शिवाय 2,590 रुपये रोख, डेबीट कार्ड, आधार कार्ड, डिजिटल वजन काटा आदी साहित्य जप्त केले. टाक याला अटक झाली असली तरी त्याला मदत करणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. महंमद फारुख महंमद उमर टाक हा मुळचा राजस्थानचा असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणाशी राजस्थान नेटवर्क काम करते आहे का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.