Sharad Pawar and Amit Shah | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांची आज दिल्ली येथे भेट होत आहे. केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर अमित शाह यांना शरद पवार पहिल्यांदाच भेट आहेत. त्यामुळे या भेटीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंधरादिवसांपूर्वीच एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यातही एक बैठक पार पडली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि अमित शाह यांच्यात बैठक पार पडत आहे. सहकार मंत्रालयाच्या कामाबाबत अमित शाह आणि पवार यांच्यात भेट होणार असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यानंतर आता अमित शाह यांच्यासोबत ही भेट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा, तर्कवितर्क लढविण्यात आले होते. मात्र, ही बैठक राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर होती. असे सांगत शरद पवार यंांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, शरद पवार यांनी याबबत एक ट्विटही केले होते. तसेच, पंतप्रधानांना दिलेले पत्रही पवार यांनी ट्विटसोबत पोस्ट केले होते. (हेही वाचा, Pegasus Snooping Controversy: राहुल गांधी यांची विरोधकांसोबत ब्रेकफास्‍ट मीटिंग; सत्ताधाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रणनितीसाठी बैठक)

खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीलाही सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकी वेळी जवळपास 14 विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

दरम्यान, राज्याती अनेक सहकारी साखरकारखान्यांविरोधात सरकारने कडक धोरण राबवले आहे. त्यामुळे विविध राजकीय नेत्यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आणि बिलं थकवलेल्या तसेच, व्यवहारांमध्ये अनियमितता असलेल्या कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, मध्यंतरी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती की, सहकार हा विषय राज्य सरकारच्याच कार्यक्षेत्राील आहे.