मराठी भाषा गौरव दिन आज 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. आता मराठी जनांची आपल्या भाषेला 'अभिजात भाषेचा दर्जा' मिळावा ही मागणी आहे. आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा मराठी बांधवांना साद घातली आहे. मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करु. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
पहा ट्वीट
आपल्या एकीची वज्रमूठ म्हणजे आपली मराठी भाषा ! #मराठी_राजभाषा_दिन #MarathiRajbhashaDin pic.twitter.com/dlxjFCzPOH
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 27, 2023
'... मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !' #मराठीराजभाषादिन #MarathiRajbhashaDin pic.twitter.com/a82MFIyveS
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2023